Wednesday, August 20, 2025 01:57:45 PM

'भारताच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह 24 तास देखरेख करत आहेत'; इस्रोच्या अध्यक्षांची माहिती

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी धोरणात्मक हेतूने 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत.

भारताच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह 24 तास देखरेख करत आहेत इस्रोच्या अध्यक्षांची माहिती
ISRO Chairman V. Narayanan
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, इस्रोच्या अध्यक्षांचे एक मोठे विधान समोर आले आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी धोरणात्मक हेतूने 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. आगरतळा येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या (CAU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना इस्त्रोच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली. 

यावेळी व्ही. नारायणन यांनी सांगितले की, जर आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या 7 हजार किलोमीटरच्या समुद्री क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण फारसे काही साध्य करू शकत नाही, असंही नारायणन यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा - युद्धबंदीनंतरही जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटचे आदेश का देण्यात आले? जाणून घ्या

आतापर्यंत 127 उपग्रह प्रक्षेपित - 

इस्रोने आतापर्यंत एकूण 127 भारतीय उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये खाजगी ऑपरेटर आणि शैक्षणिक संस्थांचे उपग्रह देखील समाविष्ट आहेत. यापैकी 22 लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आणि 29 जिओ-सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट मध्ये आहेत, जे केंद्र सरकारच्या मालकीचे आहेत. भारताकडे सुमारे एक डझन गुप्तचर किंवा पाळत ठेवणारे उपग्रह आहेत. यामध्ये कार्टोसॅट आणि आरआयएसएटी मालिका तसेच एमिसॅट आणि मायक्रोसॅट मालिका समाविष्ट आहेत, ज्या विशिष्ट देखरेखीच्या कामांसाठी डिझाइन केल्या आहेत.

हेही वाचा - काश्मीरबाबत पंतप्रधान मोदींनी दिली मोठी अपडेट

52 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार- 

याशिवाय, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) चे अध्यक्ष पवन कुमार गोएंका यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, भारत पुढील पाच वर्षांत 52 उपग्रहांचा समूह कक्षेत ठेवेल जेणेकरून भारताची अवकाश-आधारित देखरेख क्षमता वाढेल. नवीन उपग्रहांमुळे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास, सीमांवर लक्ष ठेवण्यास आणि लष्करी कारवायांमध्ये रिअल-टाइम समन्वय सुधारण्यास मदत होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री