नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राबद्दल हरियाणा पोलिसांनी रविवारी मोठा खुलासा केला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होती. हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार यांनी सांगितले की, हरियाणातील हिसार येथील रहिवासी ज्योती मल्होत्राला संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल आणि पाकिस्तानी नागरिकाच्या सतत संपर्कात राहिल्याबद्दल अटक करण्यात आली. केंद्रीय एजन्सीकडून इनपुट मिळाले होते, ज्याच्या आधारे ज्योतीला अटक करण्यात आली. तिने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे आणि चीनलाही भेट दिली आहे. सध्या तो 5 दिवसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - 'दुश्मन बॉर्डरपारच नसतो; घरातही असतो' पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रासह सहा जण अटकेत
पहलगाममधील हल्ल्यावेळी ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात -
जेव्हा दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 निष्पाप लोकांना लक्ष्य केले तेव्हा ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात होती. तसेच तिच्या पाकिस्तान भेटीचा खर्च पाकिस्तानने केला. तिच्यासोबत इतर काही लोकांचीही ओळख पटली आहे, ज्यांचा तपास सुरू असल्याचंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा - 'तिन्ही दलांनी विटेला दगडाने उत्तर दिलं...'; अमित शाहांकडून भारतीय लष्कराचं कौतुक
ज्योती मल्होत्रा जेव्हा पाकिस्तानला गेली होती तेव्हा ती तिथे काही महत्त्वाच्या लोकांना भेटली होती. याची देखील चौकशी सुरू आहे. ती गुप्तचर संस्थेच्या रडारवर होती. तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि सर्व व्हिडिओंचीही चौकशी केली जात आहे. तसेच, ज्योतीचे बँक खाते, फोन नंबर आणि लॅपटॉपची चौकशी केली जाईल. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, ज्योती मल्होत्राची पोलिस रिमांडमध्ये चौकशी केली जात आहे. आयटी सेलची टीम वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास करत आहे.