Thursday, August 21, 2025 02:10:35 AM

सोनप्रयागमध्ये भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; SDRF ने वाचवले 40 यात्रेकरूंचे प्राण

भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.

सोनप्रयागमध्ये भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित sdrf ने वाचवले 40 यात्रेकरूंचे प्राण
Edited Image

सोनप्रयाग: उत्तराखंडच्या सोनप्रयागजवळ भूस्खलन झाल्यामुळे गौरीकुंड येथे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक आशिष डिमरी यांच्या नेतृत्वाखाली SDRF सोनप्रयागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. ऑपरेशनदरम्यान सुमारे 100 अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा - राजस्थानामधील सरकारी शाळेचे छत कोसळले; 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 28 जण जखमी

सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे. SDRF अजूनही हाय अलर्टवर असून स्थानिक पातळीवर निरीक्षण आणि मदत कार्य सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) देहरादून, चंपावत, नैनिताल आणि उधम सिंह नगरसह डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारघाटीतील रुमसी गावात घरांचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन! राजस्थानच्या महिलेचा मृत्यू, यात्रा तात्पुरती स्थगित

प्रशासन सतर्क 

नागरिकांनी नदी, ओढे आणि डोंगराळ भागात जाण्याचे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. हवामानाचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री