Thursday, August 21, 2025 02:55:38 AM

अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन! राजस्थानच्या महिलेचा मृत्यू, यात्रा तात्पुरती स्थगित

गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या.

अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन राजस्थानच्या महिलेचा मृत्यू यात्रा तात्पुरती स्थगित
Landslide during Amarnath Yatra प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली. गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यानंतर त्यांना वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मुसळधार पावसामुळे भूस्खलन -  

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बालटाल मार्गावरील रेलपाथरीजवळील Z-टर्न या ठिकाणी बुधवारी अचानक भूस्खलन झालं. डोंगरावरून पावसाचं मोठं पाणी खाली आल्यानंतर रस्त्यालगत माती आणि दगड वाहून खाली आले. त्यामुळे प्रवाशांच्या हालचाली थांबवाव्या लागल्या आणि आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आली.

हेही वाचा - दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; मुंबईत आपत्कालीन लँडिंग

यात्रा तात्पुरती स्थगित - 

दरम्यान, भूस्खलन आणि खराब हवामानामुळे 17 जुलै रोजी एक दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही बेस कॅम्पमधून पवित्र गुहेकडे कोणत्याही यात्रेकरूंना जाऊ दिलं जाणार नाही. यात्रेच्या मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) ने मोठ्या संख्येने यंत्रसामग्री व कर्मचारी तैनात केले आहेत. आतापर्यंत 2.47 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथच्या पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे. प्रशासनाकडून यात्रेकरूंना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा - PM Dhan Dhanya Krushi Yojana:: 100 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आनंद; पंतप्रधानांच्या नवीन घोषणेमुळे बऱ्याच गोष्टी बदलतील

काश्मीर विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले की, 'सततच्या पावसामुळे ट्रॅकवर काही ठिकाणी खच पडत आहे. त्यामुळे आज कोणतीही यात्रा हालचाल परवानगीशिवाय केली जाणार नाही. मात्र, काल रात्री पंजतरणीमध्ये थांबलेल्या यात्रेकरूंना सुरक्षा यंत्रणांच्या तैनातीत बालटालकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. हवामान सुधारल्यास उद्यापासून यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री