छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड चकमक उडाली. या कारवाईत तब्बल 16 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले असून, घटनास्थळी अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बस्तर भागातील जंगलांमध्ये मोठी मोहिम उघडली होती. इंनसास आणि SLR सारख्या शक्तिशाली शस्त्रसाठ्यामुळे ठार झालेल्यांमध्ये वरिष्ठ नक्षल नेत्यांचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: म्यानमारध्ये भूकंपाचा तडाखा! भूकंपात 144 बळी, 30 लाख विस्थापित
संघर्ष अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भागात काही दिवसांपूर्वीच 30 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तसेच, मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केले आहे.सुरक्षा दलांचा हा ऑपरेशन अजूनही सुरू असून, नक्षलवाद्यांच्या क्रूरतेला आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई निर्णायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.