Thursday, September 04, 2025 08:12:55 AM

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला! राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर गोळीबार

जम्मू-काश्मीरमधून अत्यत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजौरीतील सुंदरबनी भागात संशयित दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर गोळीबार
Terrorists Opened Fire On Army Truck In Rajouri
Edited Image

Terrorists Opened Fire On Army Truck In Rajouri: जम्मू आणि काश्मीरमधील सुंदरबनी येथे आज दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील एका गावात संशयित दहशतवाद्यांनी बुधवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याचं लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं आहे. हा हल्ला घनदाट जंगलातून करण्यात आला, त्यानंतर सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

लष्कराकडून शोध मोहीम सुरू - 

मिळालेल्या माहितीनुसार, पेली फॉल सुंदरबनी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला अखनूरच्या मलाला आणि राजौरीच्या सुंदरबनीजवळील भागात झाला. गोळीबारानंतर संशयित दहशतवादी पळून गेले. दहशतवादी जवळच्या जंगलात लपले असण्याची शक्यता आहे. गोळीबारानंतर, परिसरातून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा

दहशतवादी हल्ल्यात कोणतीही जीवितहानी नाही - 

सुंदरबनी सेक्टरमधील फाल गावाजवळ झालेल्या या गोळीबारात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्या भागातून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर काही राउंड गोळीबार केला. हा परिसर दहशतवाद्यांसाठी पारंपारिक घुसखोरीचा मार्ग मानला जातो. 

हेही वाचा - Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचे उत्पन्न तीन वर्षांत अडीच पटीने वाढले, जाणून घ्या किती झाली कमाई

भारतीय सैन्याकडून परिसराला वेढा - 

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी 12:45 वाजता राजौरी सेक्टरजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. लष्कराने परिसराला वेढा घातला आहे आणि शोधमोहीम सुरू आहे. ज्या भागात गोळीबार झाला तो भाग पाकिस्तानला लागून आहे. तत्पूर्वी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मंगळवारी कुपवाडा जिल्ह्यातील दोन पाकिस्तानस्थित दहशतवादी व्यवस्थापकांच्या लाखो रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या. 
 


सम्बन्धित सामग्री