Delhi Election Result 2025: दिल्ली निवडणुकीच्या निकालांमध्ये मतमोजणीच्या नंतरच्या टप्प्यात भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी आग्नेय दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या चुरशीच्या लढाईत आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव केला. मारवाह यांनी सिसोदिया यांना 600 मतांनी पराभूत केलं.
जंगपुरा मतदारसंघात पराभव स्वीकारल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगली लढत दिली. आम्ही सर्वांनी कठोर परिश्रम केले. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण, मी 600 मतांनी हरलो. जिंकलेल्या उमेदवाराचे मी अभिनंदन करतो.
हेही वाचा - जेलची हवा खाणाऱ्या दिल्लीतील 'त्या' उमेदवारांची काय आहे स्थिती? जनतेने नाकारलं की, स्विकारलं? जाणून घ्या
नऊ फेऱ्यांच्या मतमोजणीच्या शेवटी, मारवाह यांना सिसोदिया यांच्यापेक्षा 572 मतांची आघाडी होती. काँग्रेसचे फरहाद सुरी 6 हजार पेक्षा जास्त मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या काही फेऱ्यांमध्ये चांगले प्रदर्शन करणारे मनीष सिसोदिया सातव्या फेरीनंतर अचानक 240 जागांच्या कमतरतेत घसरले. पाचव्या फेरीच्या शेवटी ते 3869 मतांनी आघाडीवर होते, परंतु सहाव्या फेरीत त्यांना वाईट कामगिरी करावी लागली.
हेही वाचा - Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?
अरविंद केजरीवाल पराभूत -
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या नवी दिल्लीतील बालेकिल्ल्यात भाजपकडून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजवाल यांचा पराभव केला आहे. तथापी, आपचे आणखी एक प्रमुख नेत्या आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी रमेश बिधुरी यांच्याशी झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर कालकाजी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.