Fire In Firecracker Factory at Banaskantha
Edited Image, X
Fire In Firecracker Factory at Banaskantha: गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत 17 जणांचा जिवंत होरपळून वेदनादायक मृत्यू झाला. पाणी तापवणाऱ्या बॉयलरच्या स्फोटामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. त्याचवेळी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याशिवाय, या आगीत अनेक कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डीसा जीआयडीसीमधील फटाक्यांच्या गोदामात स्फोट -
बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमधील फटाक्यांच्या गोदामात आज दुपारी अचानक आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमुळे कारखान्याचा स्लॅबही तुटून खाली पडला, ज्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आणि काही काळ घटनास्थळी गोंधळ उडाला. डीसा तालुका पोलिसांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा - Heatwave Alert: एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उष्णतेचा इशारा; कोणत्या राज्यात वाढणार उष्णतेचा पारा? जाणून घ्या
हेही वाचा - आता मुलांना शाळेत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात 10 टक्के कमी तेल वापरले जाणार; केंद्र सरकारने 'या' कारणामुळे घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
बचाव पथक घटनास्थळी दाखल -
प्राप्त माहितीनुसार, स्फोट झालेल्या कारखान्याचे नाव दीपक ट्रेडर्स आहे. ही कंपनी फटाके बनवत असे. सध्या घटनास्थळावरून कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली असून गोदामातून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी महिर पटेल घटनास्थळी पोहोचले असून कारखान्याचे मालक दीपक खुबचंद सिंधी पळून गेल्याची बातमी येत आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.