Meerut Murder Case: सौरभ हत्याकांडात तुरुंगवास भोगत असलेल्या मुस्कानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुस्कानची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुस्कान रस्तोगी तिच्या पती सौरभच्या हत्येच्या प्रकरणात तुरुंगात आहे. प्राप्त माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी तिची तब्येत अचानक बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने एका महिला डॉक्टरला बोलावले. 7 एप्रिल रोजी, डॉ. कोमल यांनी केलेल्या तपासणीत मुस्कानच्या गरोदरपणाची पुष्टी झाली.
मुस्कानला जामीन मिळू शकतो का?
भारतीय कायद्यानुसार, मानवतेच्या आधारावर गर्भवती महिलांना जामीन देण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणांमध्ये, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांनीही अशा प्रकरणांमध्ये दिलासा दिला आहे. अशा परिस्थितीत, मुस्कानला जामीन मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, यावर अंतिम निर्णय न्यायालय घेईल.
हेही वाचा - Meerut Murder Case Update: आरोपी मुस्कानचे वडील म्हणाले, ''मुस्कानला फाशी झालीच पाहिजे'
काय आहे प्रकरण?
सौरभ नावाच्या तरुणाची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे एका निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट ओतण्यात आल्याने हे हत्याकांड खूप चर्चेत होते. या प्रकरणात सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना अटक करण्यात आली. अलीकडेच, सौरभ आणि मुस्कानची 6 वर्षांची मुलगी तिच्या आजी-आजोबांसोबत असल्याची बातमी समोर आली होती. पण मृत सौरभच्या कुटुंबाला त्यांची नात त्यांच्याकडे ठेवायचे आहे. परंतु, मुस्कानची आई म्हणते की तिला मुस्कानच्या मुलीबद्दल भावनिक प्रेम आहे. ती गेल्या सहा वर्षांपैकी बहुतेक काळ त्यांच्यासोबत राहते.
हेही वाचा - चेहऱ्यावर ''मुस्कान'' अन् मनात सैतान! सौरभला मारण्यापूर्वी त्याच्यासोबत शेवटचा डान्स; जाणवू पण दिलं नाही.. VIDEO Viral
तथापी, सौरभचा भाऊ राहुल या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल राजपूत उर्फ बबलू यांनी सांगितले की, मुलगा आणि भाऊ गमावल्याच्या धक्क्यातून कुटुंब अद्याप सावरलेले नाही. आता आमची (सौरभची) आई झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतरच झोपते. भावाचा फोटो माझ्या नजरेसमोरून जात नाही. जर पिहू या घरात आली तर आईला बळ मिळेल.