करचुकवेगिरी आणि काळ्या पैशाचा मागोवा घेण्यासाठी सरकारने नवा फंडा अवलंबला आहे. सोशल मीडियावरील संदेशांवर नजर ठेवत सरकार आता करचुकव्यांचा पर्दाफाश करत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गुगल मॅप्सच्या साहाय्याने पैसे लपवण्यासाठी वापरण्यात येणारी ठिकाणे शोधण्यात आली आहेत. इन्स्टाग्राम अकाउंट्सद्वारे अज्ञात मालमत्ता धारकांचा मागोवा घेतला जात आहे. विशेष म्हणजे, व्हॉट्सअॅप संदेशांच्या आधारे तब्बल 200 कोटी रुपयांच्या क्रिप्टो मालमत्तेशी संबंधित काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.
कर चोरी रोखण्यासाठी सरकार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून, आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना हा ‘मॅसेज ट्रॅप’ मोठा धडा शिकवू शकतो.