Wednesday, August 20, 2025 11:31:09 AM

New Mumbai Airport: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असून, लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

new mumbai airport नवी मुंबईकरांसाठी खुशखबर विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

सध्या मुंबईतील अंधेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असून विलेपार्लेमध्ये देशांतर्गत विमानतळ स्थित आहे. अंधेरीमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वी सहार विमानतळ या नावाने ओळखला जात होता. 1850 एकर परिसरामध्ये असलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळतात. या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळदेखील आपल्याला पाहायला मिळते जे विलेपार्ले रेल्वे स्टेशन पासून थोड्याच अंतरावर आहे. मुंबईतील अनेक उपनगरांत विविध क्षेत्रात प्रगती होत असून नवी मुंबईमध्ये कारखाने त्यासोबतच अनेक कंपन्यांमध्येदेखील वाढत होत आहे. मात्र नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन एप्रिलमध्ये होणार असून, 15 मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी संयुक्त पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. या टीममध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) चे अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक ब्युरोचे (BCAS) प्रादेशिक संचालक प्रकाश निकम, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज (AAHL) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

हेही वाचा: Weather Updates : आयएमडीने वर्तवला 'या' ठिकाणी बर्फाचा अंदाज

              24 फेब्रुवारी रोजी दिवसभराच्या तपासणीनंतर, 25 फेब्रुवारी रोजी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळाची भेट दिली. या दोन दिवसाच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर, DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मूल्यांकन पूर्ण झाल्याची माहिती दिली. DGCA च्या वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "मूल्यांकनादरम्यान, आम्हाला विमानतळ ऑपरेटरने कळवले की ते 5 मार्चपर्यंत सर्व आवश्यक असणारी परवाणगी मिळविण्यासाठी अर्ज करतील". या सर्व तपासणीनंतर, आता विमानतळ ऑपरेटर नियमांनुसार विमानतळ परवान्यासाठी DGCA कडे अर्ज करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्ज 15 मे पासून सुरू होणाऱ्या फ्लाइट ऑपरेशनसाठी असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमध्ये येण्यासाठी रस्ते आणि जलमार्ग या दोन्ही मार्गांद्वारे प्रवेश करता येईल अश्या पद्धतीने विमानतळाची रचना केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1,160 हेक्टर क्षेत्रात बांधले गेले आहे. विमानतळ सुरुवातीला टर्मिनल वन वरून चालेल, ज्याची वार्षिक क्षमता 20 दशलक्ष प्रवासी आहे. असे नोंदवण्यात आले की प्रवासी वॉटर टॅक्सीद्वारे 17 मिनिटांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचू शकतात. 
             नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होणार असल्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यासोबतच अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर अनेक रिक्षा चालकांपासून आणि अनेकांना रोजगाराची सुविधादेखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


सम्बन्धित सामग्री