Wednesday, August 20, 2025 09:20:33 AM

बहिणींसाठी खास गिफ्ट! रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' राज्यात महिलांसाठी मोफत बस सेवा

देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही सेवा एक दिवस, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस उपलब्ध असेल.

बहिणींसाठी खास गिफ्ट रक्षाबंधनाच्या दिवशी या राज्यात महिलांसाठी मोफत बस सेवा

नवी दिल्ली: देशभरात 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. भावाला राखी बांधण्यासाठी अनेक बहिणी लांबचा प्रवास करतात. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी महिलांना रक्षाबंधनाची खास भेट दिली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही सेवा एक दिवस, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस उपलब्ध असेल.

राज्यनिहाय मोफत बस सेवेचा तपशील - 

उत्तर प्रदेश - 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले की, 8 ऑगस्ट सकाळी 6 ते 10 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत महिलांना मोफत बस सेवा दिली जाईल. तसेच शहरी व ग्रामीण भागात जास्तीच्या फेऱ्या चालवल्या जातील.

हरियाणा - 
महिला व 15 वर्षांपर्यंतच्या मुलांना 8 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हरियाणा रोडवेजच्या सामान्य बसेस व दिल्ली-चंदीगड बसमध्ये मोफत प्रवास करता येईल.

राजस्थान - 
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 9 व 10 ऑगस्ट रोजी महिलांसाठी दोन दिवस मोफत बस सेवा जाहीर केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस या सेवेत सहभागी असतील.

चंदीगड - 
CTU व CCBSS अंतर्गत चंदीगड, मोहाली आणि पंचकुलामध्ये चालणाऱ्या सर्व लोकल एसी-नॉन एसी बसेसमध्ये महिलांना 9 ऑगस्ट रोजी मोफत सेवा दिली जाईल.

हेही वाचा - 'लोकांचा मतदार यादीवर विश्वास नाही...'; राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुराव्यांसह उपस्थित केले गंभीर प्रश्न

उत्तराखंड - 
उत्तराखंड परिवहन महामंडळाच्या सर्व सरकारी बसेसमध्ये महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी मोफत प्रवास उपलब्ध असेल. उत्तराखंड सरकार दरवर्षी हा उपक्रम राबवते. 

कर्नाटक, पंजाब, दिल्ली - 
या राज्यांमध्ये महिलांसाठी आधीपासूनच मोफत बस सेवा लागू आहे. त्यामुळे रक्षाबंधनालाही महिलांना तिकिटाचा खर्च करावा लागणार नाही.

हेही वाचा - ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण म्हणजे 'आर्थिक ब्लॅकमेलिंग'; राहुल गांधींनी मोदींना दिला 'हा' सल्ला

मध्य प्रदेश - 
मध्य प्रदेशातील महिलांसाठीही रक्षाबंधनाच्या दिवशी आनंदाची बातमी आहे. भोपाळ सिटी लिंक लिमिटेड 9 ऑगस्ट रोजी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. इंदूरच्या महापौरांनी सांगितले आहे की महिला रक्षाबंधनाच्या दिवशी मोफत प्रवास करू शकतील.
 


सम्बन्धित सामग्री