Nita Ambani Announces Medical City: मुंबईच्या मध्यभागी रिलायन्स फाउंडेशन 2000 बेडचे अत्याधुनिक वैद्यकीय शहर उभारणार असल्याची घोषणा संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी 29 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. नीता अंबानी म्हणाल्या की, हे फक्त एक सामान्य रुग्णालय नसेल, तर भारतातील आरोग्यसेवेमध्ये नवोपक्रमाचे नवीन केंद्र असेल. एआय-संचालित निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जगातील सर्वोत्तम डॉक्टरांच्या सेवेमुळे हे वैद्यकीय शहर जागतिक दर्जाचे केंद्र ठरेल. रिलायन्स फाउंडेशनची ही योजना मुंबईच्या आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचीही स्थापना
या वैद्यकीय शहरात एक वैद्यकीय महाविद्यालय देखील असेल. या घोषणेसोबतच नीता अंबानी यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की आपल्या देशाला या योजनेचा अभिमान वाटेल. सध्या मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने सेवेत 10 वर्षे पूर्ण केली असून, आतापर्यंत 33 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. हे भारतातील सर्वोच्च मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा - Reliance Jio IPO: रिलायन्स जिओचा आयपीओ कधी येणार? गुंतवणूकदारांसाठी मुकेश अंबानींनी केली खास घोषणा
130 एकरांवर कोस्टल रोड गार्डन
आरोग्य क्षेत्राबरोबरच मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करून 130 एकरांवर भव्य कोस्टल रोड गार्डन उभारण्याची घोषणाही करण्यात आली. पुढील पिढ्यांसाठी हिरवेगार गार्डन विकसित करण्याची जबाबदारी आम्हाला अभिमान आणि सन्मानाची वाटते, असेही नीता अंबानी यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा - Health Insurance: वैद्यकीय महागाईमुळे ‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची कॅशलेस सुविधा बंद; रुग्णांसमोर नवीन संकट
गार्डनची वैशिष्ट्ये
दरम्यान, हे कोस्टल रोड गार्डन आणि प्रोमेनेड हे अशा प्रकारचे पहिले सार्वजनिक ठिकाण असेल. यात फूटपाथ, सायकलिंग ट्रॅक, प्लाझा तसेच झाडे व फुलांनी सजलेले हिरवेगार पट्टे असतील. यामुळे मुंबईकरांना समुद्रकिनारी ताजी हवा आणि जादुई सूर्यास्ताचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.