Udaipur snake viral video
Edited Image
Udaipur Snake Viral Video: उदयपूरमधील एका हॉटेलमधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातील सेवाश्रम परिसरात 19 कोब्रा साप एकत्र दिसले. ही घटना कोणत्याही जंगलातील नाही तर सेवाश्रम परिसरातील एका हॉटेलमधील आहे. येथे हॉटेलच्या बागेत कोब्रा सापांचा एक समूह दिसला. बागेत एका मोठ्या सापासह 18 कोब्राची पिल्ले होती, ज्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. सध्या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील सेवाश्रम परिसरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमधील आहे. हॉटेलच्या बागेत काही रद्दीचे सामान ठेवण्यात आले होते. या रद्दीतून सापांची हालचाल दिसून आली. त्यानंतर तत्काळ वन्यप्राणी बचाव कार्यकर्त्यांना याची माहिती देण्यात आली. वन्यजीव तज्ज्ञ डॉ. चमन सिंग चौहान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रद्दी हटवल्यानंतर एकामागून एक कोब्रा साप बाहेर पडू लागले. यात एक मोठा नाग आणि 18 नवजात पिल्लांचा समावेश होता. सर्पांच्या या दृश्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
हेही वाचा - श्रावण महिन्यात प्रत्यक्षात किंवा स्वप्नात साप दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो? जाणून घ्या
डॉ. चौहान यांच्या दक्षतेमुळे सर्व सापांना कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आलं आहे. डॉ. चौहान यांनी सांगितले की, कोब्रा साप एकावेळी 12 ते 20 अंडी घालतो. यापैकी अलीकडेच हे 18 पिल्लं अंड्यातून बाहेर आली असावीत. विशेष बाब म्हणजे मोठ्या नागाने त्याच्या पिल्लांना कोणतीही हानी केली नाही. कारण, अनेकदा कोब्रा साप त्याच्या पिल्लांना खातो.
उदयपूरमध्ये 19 साप दिसले एकत्र, पहा व्हायरल व्हिडिओ -
हेही वाचा - Amravati: 13 फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव
तथापी, हॉटेल प्रशासनाकडून परिसराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच वन विभागाने देखील तपासणी करून सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या सापांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.