नवी दिल्ली: एखादी वस्तू खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहक सर्वप्रथम तिची एमआरपी पाहतो. पण अनेकदा वस्तूंवर जास्त एमआरपी छापून ती कमी दरात विकली जाते, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वस्तू सवलतीत मिळाली की फसवणूक झाली? असा प्रश्न ग्राहकांना पडतो. आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एमआरपी संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
MRP नियमांमध्ये होणार मोठे बदल -
केंद्र सरकार आता एमआरपी नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे, जेणेकरून ग्राहकांना वस्तूंची खरी किंमत कळेल आणि पारदर्शकता वाढेल. प्रत्यक्षात, आतापर्यंत कंपन्या स्वतःहून एमआरपी छापतात. यासोबतच, कंपन्यांना वस्तूच्या उत्पादनाचा खर्च आणि नफ्याबद्दल कोणतीही माहिती द्यावी लागत नाही, परंतु आता सरकार अशा सूचना जारी करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाचा एमआरपी उत्पादनाच्या किंमती आणि मार्केटिंग खर्च स्पष्ट करणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, 16 मे रोजी ग्राहक व्यवहार विभागाने उद्योग संघटना, ग्राहक गट आणि कर अधिकाऱ्यांसोबत एक मोठी बैठक घेतली. त्या बैठकीत एमआरपीच्या विद्यमान प्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशा परिस्थितीत, आता सरकार एमआरपीसाठी नवीन नियम आणण्याची तयारी करत आहे.
हेही वाचा - सरकारने बदलले मधुमेह आणि संसर्गजन्य औषधांसह 71 औषधांचे दर; काय आहेत नवीन किमती?
ग्राहकांना काय फायदा होणार?
वस्तूची खरी किंमत समजेल.
फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.
दुकानदारांवर अनावश्यक शंका थांबतील.
एमआरपी ठरवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.
हेही वाचा - दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; मुंबईत आपत्कालीन लँडिंग
कायदेशीर मापन कायदा 2009 अंतर्गत, ग्राहक व्यवहार मंत्रालय पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पॅकेज केलेल्या वस्तूंवरील वजन, मापन आणि लेबल तपासते. परंतु हा कायदा किंमत निश्चित करण्याचा कोणताही मार्ग सांगत नाही. अशा परिस्थितीत, सरकार हा नियम बदलण्याची तयारी करत आहे.