Wednesday, August 20, 2025 10:22:45 AM

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही ऑपरेशन अखल सुरू; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले आहे.

operation akhal जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही ऑपरेशन अखल सुरू 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Operation Akhal प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Operation Akhal: दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल जंगलात सुरू असलेल्या ऑपरेशन अखलमध्ये रविवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने पुष्टी केली आहे की, रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चकमकीदरम्यान अधिक एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. लष्कराने सांगितले की, 'सतर्क जवानांनी नियोजित कारवाई केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला योग्य उत्तर देण्यात आले.' 

गुप्तचर माहितीवर आधारित कारवाई

प्राथमिक तपासात ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथील हरिस नजीर डार म्हणून झाली आहे. उर्वरित अतिरेक्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. 1 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांना अखल वनपट्ट्यात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यानुसार, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या शोधमोहीम सुरू केली. त्याच रात्री गोळीबार सुरू झाला आणि ऑपरेशन अखल सुरू करण्यात आले.

हेही वाचा - Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादविरोधी कारवाईत एक दहशतवादी ठार

रणनीतीपूर्वक घेराव - 

सुरुवातीच्या चकमकीनंतर रात्रभर कारवाई स्थगित करण्यात आली होती. मात्र, दहशतवादी घनदाट जंगलातून पळून जाण्याचा प्रयत्न करू नयेत म्हणून घेराव आणखी मजबूत करण्यात आला. शनिवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रविवारी लष्कराने जंगलात प्रवेश करून उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा चकमक सुरु झाली.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार

ऑपरेशन अजूनही सुरू - 

सध्या ऑपरेशन अखल अजूनही सुरू आहे. लष्कराच्या विशेष पथकांकडून उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण परिसरात उच्च सतर्कता पाळली जात आहे. तथापी, नागरिकांना जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री