Wednesday, August 20, 2025 12:00:02 PM

सत्ताधाऱ्यांच्या वक्फ दुरूस्ती विधेयकाविरोधात विरोधक एकवटले

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला.

सत्ताधाऱ्यांच्या वक्फ दुरूस्ती विधेयकाविरोधात विरोधक एकवटले

मुंबई : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना विधेयक मांडण्यासाठी आमंत्रित केले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक मांडले.  भारतात रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. वक्फ बोर्डाच्या आजच्या कारवाईविरुद्ध कडक भूमिका घेत वक्फ बोर्डाने संसदेवरच दावा केला होता असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला.  लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला. विरोधकांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवल्याचे पाहायला मिळाले.

ठाकरे गटाने वक्फ सुधारणेला विरोध केला आहे. अरविंद सावंत म्हणतात वक्फ सुधारणा विधेयक खासगी हितासाठी आहे. त्यावर विधेयकाला समर्थन की विरोध, सावंतांनी का सांगितलं नाही ? असा सवाल ठाकरे गटाला रिजिजू यांनी केला आहे. तर ठाकरे गटाला हिंदू आणि हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचे म्हणत ठाकरे गटावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कडाडले आहेत. 

हेही वाचा : वक्फ विधेयक संसदेत सादर; काय म्हणाले किरेन रिजिजू?

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, 2024 वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बुधवारी लोकसभेत चर्चेदरम्यान त्यांनी भाजप सरकार हे विधेयक आणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी अखिलेश यादव म्हणाले, भाजपचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा असून सरकारचा खरा हेतू वक्फ जमिनी ताब्यात घेण्याचा आहे. देशातील खऱ्या मुद्द्यांकडे लक्ष दिले जात नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यावर वक्फ सुधारणा उद्योगपतींच्या फायद्यासाठी नाही असं म्हणत आखिलेश यादवांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडला आहे. राज्यघटना हाच भारताचा आत्मा आहे. वक्फ सुधारणा पारदर्शकतेसाठीच आहे असे कौतुक खासदार अनुराग ठाकूर यांनी वक्फ विधेयकाचे केले आहे. 


सम्बन्धित सामग्री