Wednesday, August 20, 2025 07:31:24 AM

एकतेचे रंग आणतील नवी ऊर्जा, पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा!

देशवासीयांमध्ये एकतेचे रंग अधिक सखोल करेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी “एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या संदेशात म्हटले आहे.

एकतेचे रंग आणतील नवी ऊर्जा पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : संपूर्ण देशात रंगांचा उत्सव होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. “हा आनंदाचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह भरणार आहे. तसेच, देशवासीयांमध्ये एकतेचे रंग अधिक सखोल करेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी “एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या संदेशात म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही होळीच्या शुभेच्छा देत देशवासीयांना प्रेम, एकता आणि सौहार्दाचा संदेश दिला. 'होळीचा हा उत्सव आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी मिळून भारतमातेच्या सर्व संततींच्या जीवनात प्रगती, समृद्धी आणि आनंदाचे रंग भरण्याचा संकल्प करूया,' असे राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

हेही वाचा: होळीचा रंग मटणच्या स्वादात! ठाण्यात खवय्यांच्या रांगा

दरम्यान, देशभरात लोक गुलाल उधळत, नृत्य आणि गाण्यांमध्ये रंगून होळीचा आनंद लुटत आहेत. संबलसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसून येत आहे. आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि अनोळखी लोकांनाही गुलाल लावत, आनंद आणि एकतेचा उत्सव साजरा केला जात आहे.

होळी हा केवळ रंगांचा सण नसून वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि चांगल्याचा वाईटावर विजयाचा उत्सव आहे. 


सम्बन्धित सामग्री