नवी दिल्ली : दिल्लीतील द्वारका एक्सप्रेसवेचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-II (UER-II) हे प्रकल्प राजधानीतील गर्दी कमी करण्याच्या सरकारच्या व्यापक योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले आहेत. ज्याचा उद्देश दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि वाहतूक कमी करणे हा आहे. उद्या रविवार, १७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन पार पडणार आहे.
द्वारका एक्सप्रेसवेचा 10.1 किमी लांबीचा दिल्ली विभाग सुमारे 5,360 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. हा विभाग यशोभूमी, डीएमआरसी ब्लू लाईन आणि ऑरेंज लाईन, येणाऱ्या बिजवासन रेल्वे स्टेशन आणि द्वारका क्लस्टर बस डेपोला मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटीदेखील प्रदान करेल.
हेही वाचा : Donald Trump - Vladimir Putin Meeting : पुतिन-ट्रम्प भेट ; ऐतिहासिक बैठक, जागतिक राजकारणावर गहन चर्चा
शहरी विस्तार रस्ता-II (UER-II) च्या अलीपूर ते दिचाओं कलान भागासह बहादुरगड आणि सोनीपतला नवीन जोडणी जोडण्यासाठी 5,580 कोटी रुपये खर्च आला आहे. यामुळे दिल्लीच्या अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड आणि मुकरबा चौक, धौला कुआं आणि राष्ट्रीय महामार्ग-09 सारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक सुलभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.