PM Modi to Meet Xi Jinping: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या द्विपक्षीय बैठकीची तारीख जाहीर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते रविवारी, 31 ऑगस्ट 2025 रोजी एकमेकांना भेटतील. ही बैठक एससीओ शिखर परिषदेत होणाऱ्या चर्चेबाहेर आयोजित केली जाणार असून जागतिक राजकारणात त्याचे महत्त्व खूप मोठे आहे.
एससीओ शिखर परिषद आणि मोदींचा चीन दौरा
पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदींचा हा सात वर्षातील पहिला चीन दौरा असून, उदयोन्मुख प्रादेशिक व जागतिक परिस्थितीत या भेटीचे महत्त्व अधोरेखित होते.
हेही वाचा - Trump Tariffs: ट्रम्पच्या 50 टक्के टॅरिफला भारताची टक्कर! 40 देशांसोबत करणार मोठा व्यापार करार
टॅरिफ वॉर दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा
भारत-आणि अमेरिका यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे, तर भारत अमेरिकेच्या अटींवर पूर्णपणे झुकण्यास तयार नाही. विशेषतः तेल खरेदी व व्यापारासंदर्भातील अटींवर चर्चा अपेक्षित आहे, ज्यामुळे भारत-चीन चर्चा जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षवेधी ठरणार आहे.
हेही वाचा - India America Relationship: टॅरिफ वादातदरम्यान भारत-अमेरिका संबंध मजबूत राहतील; अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांचे मोठे विधान
शिखर परिषदेत सहभागी इतर प्रमुख नेते
एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय नेते सहभागी होतील, ज्यात उत्तर कोरियाचे किम जोंग उन, रशियाचे व्लादिमीर पुतिन, इंडोनेशियाचे प्रबोवो सुबियांतो, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचा समावेश आहे. या बैठकीत भारत-चीन द्विपक्षीय संबंध, व्यापार, सुरक्षा आणि जागतिक राजकारणातील परिस्थिती यावर चर्चा होणार असल्याने जागतिक स्तरावर याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे.