Sunday, August 31, 2025 10:55:10 PM

मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर पोलिसांनी मोठी कारवाई! 110 दंगलखोरांना अटक

पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 110 दंगलखोरांना अटक केली आहे, त्यापैकी 70 जण सुती आणि 41 जण शमशेरगंज येथील आहेत.

मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर पोलिसांनी मोठी कारवाई 110 दंगलखोरांना अटक
Violence in Murshidabad
Edited Image

Violence In Murshidabad: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मध्ये झालेल्या हिंसाचारावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 110 दंगलखोरांना अटक केली आहे, त्यापैकी 70 जण सुती आणि 41 जण शमशेरगंज येथील आहेत. हिंसाचारानंतर मुर्शिदाबादमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. हिंसाचारग्रस्त भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात हिंसक निदर्शने - 

याशिवाय, मुर्शिदाबादच्या सुती आणि शमशेरगंज येथे बीएसएफच्या 2 कंपन्या उपस्थित आहेत. शुक्रवारी मुर्शिदाबाद व्यतिरिक्त दक्षिण 24 परगणा आणि कोलकाता येथे वक्फ कायद्याविरोधात हिंसक निदर्शने झाली. शुक्रवारी, पश्चिम बंगालच्या विविध भागात निदर्शने सुरू असताना, काही बदमाशांनी बॉम्बस्फोट केले आणि सरकारी आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. 

हेही वाचा - Waqf Law: पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

चकमकीत अनेक पोलिस जखमी - 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तथापी, निदर्शकांशी झालेल्या चकमकीत अनेक पोलिसही जखमी झाले. गर्दीतील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या, परंतु दंगलखोर मागे हटण्यास तयार दिसत नव्हते.

हेही वाचा - ''नवीन कायद्यात वक्फच्या पवित्र भावनांचे रक्षण केले जाईल''; पंतप्रधान मोदींचा दावा

दंगलखोरांचा इतर समुदायांच्या दुकानांवर हल्ला - 

दरम्यान, वक्फच्या नावाखाली मुर्शिदाबादमध्ये एका आठवड्यात दोनदा हिंसाचार झाला आहे. 8 एप्रिल रोजी मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. दंगलीत बदमाशांनी सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान केले. त्यांनी पोलिसांच्या गाड्या, राज्य परिवहन बसेस तसेच रुग्णवाहिका पेटवून दिल्या. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की दंगलखोर पूर्णपणे तयारीने आले होते. दंगलखोरांनी केवळ हिंसाचारच केला नाही तर इतर समुदायांच्या दुकानांवरही हल्ला केला, तोडफोड केली. तसेच दुकानातील वस्तूंची लूट केली. 
 


सम्बन्धित सामग्री