Pravesh Verma, Rekha Gupta, Ashish Sood,
Edited Image
Delhi CM Oath Ceremony 2025: राजधानी दिल्लीमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. रामलीला मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार आहे आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. आज, नवनिर्वाचित भाजप आमदार विधिमंडळ पक्षनेते निवडणार आहेत. परवेश वर्मा, रेखा गुप्ता, आशिष सूद, विजेंदर गुप्ता हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याच्या अटकळा बांधल्या जात आहेत.
उद्या सकाळी 10 वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहेत. दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या बैठकीत दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्का मोर्तब होणार आहे. या बैठकीत पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. तथापि, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर अजूनही संभ्रम आहे, कारण भाजपने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजप कधीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करू शकतो.
हेही वाचा - दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला केजरीवाल आणि आतिशी यांना आमंत्रण
रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर -
माध्यमांमधील वृत्तानुसार, रेखा गुप्ता यांचे नाव दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्या एक महिला आमदार आहेत आणि वैश्य समुदायातून येतात. याशिवाय आशिष सूद, जितेंद्र महाजन आणि राजकुमार भाटिया हे पक्षातील जुने पंजाबी चेहरे आहेत. याशिवाय, प्रवेश शर्मा आणि सतीश उपाध्याय यांची नावेही चर्चेत आहेत. परवेश वर्मा हे जाट चेहरा आहेत.
हेही वाचा - Gyanesh Kumar Takes Charge As CEC: 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार
दरम्यान, विजेंद्र गुप्ता आणि मोहन सिंग बिष्ट यांची सभापती म्हणून निवड होऊ शकते. याशिवाय, शिखा राय यांचे नावही चर्चेत आहे. शिखा राय या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. या निवडणुकीत त्यांनी ग्रेटर कैलाश मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांचा पराभव केला आहे.