Wednesday, August 20, 2025 02:01:20 PM

राष्ट्रपतींनी स्वीकारला जगदीप धनखड यांचा राजीनामा; निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतींनी स्वीकारला जगदीप धनखड यांचा राजीनामा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार
Edited Image

नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. 2022 पासून या पदावर असलेल्या 74 वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ आणखी दोन वर्ष शिल्लक होता. परंतु, पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.  

राजीनामा देण्यापूर्वी ते दिवसभर राज्यसभेत उपस्थित होते. यानंतर त्यांनी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक बोलावली, मात्र त्या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा राजीनामा जाहीर करून सर्वांना धक्का दिला. तथापी, धनखड यांचा राजीनामा मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. निरोप समारंभालाही ते गैरहजर राहिले, यामुळे राजीनाम्यामागे केवळ आरोग्याचे नव्हे तर राजकीय कारणेही असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा; राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात सांगितलं ''हे'' कारण

पंतप्रधान मोदींनी धनखड यांना दिल्या शुभेच्छा - 

हेही वाचा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट! AIIMS दिल्लीने दिली माहिती

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज जेडीयूचे खासदार हरिवंश यांनी चालवले. तथापी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जगदीप धनखड जी यांना उपराष्ट्रपतींसह विविध भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.' 
 


सम्बन्धित सामग्री