Wednesday, August 20, 2025 09:15:07 AM

'कागदपत्रे सादर करा किंवा माफी मागा'; डबल व्होटिंग आरोपानंतर राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीस बजावली असून, 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

कागदपत्रे सादर करा किंवा माफी मागा डबल व्होटिंग आरोपानंतर राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘डबल व्होटिंग’ आरोपांवर निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना नोटीस बजावली असून, 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केलेली कागदपत्रे तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार कर्नाटकातील शकुन राणी नावाच्या महिलेनं दोनदा मतदान केलं आहे. त्यांनी काही दस्तऐवज दाखवून हा डेटा निवडणूक आयोगाकडून मिळाल्याचा दावा केला होता.

हेही वाचा - काँग्रेसची देशव्यापी मोहिम! मतदार चोरी प्रकरणी राहुल गांधींनी लाँच केले खास पोर्टल

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राहुल गांधींना नोटीस - 

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, तुम्ही तुमच्या सादरीकरणात म्हटले होते की हा डेटा निवडणूक आयोगाचा आहे. तसेच तुम्ही असेही म्हटले आहे की मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या रेकॉर्डमध्ये शकुन राणी नावाच्या महिलेने दोनदा मतदान केले आहे. तपासात शकुन राणी म्हणाली आहे की तिने फक्त एकदाच मतदान केले आहे, दोनदा नाही. सुरुवातीच्या तपासात असेही उघड झाले आहे की तुम्ही दाखवलेले टिक केलेले कागदपत्र मतदान अधिकाऱ्यांनी जारी केलेले नव्हते. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, म्हणून, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या कागदपत्रांच्या आधारे शकुन राणी किंवा इतर कोणीही दोनदा मतदान केल्याचा दावा केला आहे ते कागदपत्रे द्या, जेणेकरून या प्रकरणाची योग्य चौकशी करता येईल.

हेही वाचा - बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 334 पक्षांची नोंदणी रद्द

निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा - 

दरम्यान, निवडणूक आयोगाने कठोर शब्दांत म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत किंवा देशाची माफी मागावी. आयोगाने दिलेल्या मुदतीत प्रतिसाद न आल्यास राहुल गांधींवर पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो, कारण राहुल गांधींचा आरोप थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. आगामी काळात राहुल गांधींच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री