नवी दिल्ली: मध्य प्रदेशात मजबूत प्रणाली सक्रिय असल्याने, मुसळधार पाऊस आणत आहे. गेल्या 24 तासांत शहडोलमध्ये 4 इंच पाऊस पडला. मध्यरात्रीपर्यंत 3,000 हून अधिक घरात पाणी शिरले. यामुळे बरेच नुकसान झाले आहे. रविवारी गुजरातमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. अहमदाबाद, सुरत आणि नवसारी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. नवसारीमध्ये पूर्णा नदी दुथडी भरली आहे. तिच्या पाण्याने सखल भागात पाणी भरले आहे. इतकंच नाही तर, घरे 3-4 फूट पाण्याखाली बुडाली आहेत. अहमदाबाद आणि बनासकांठा येथेही मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहे.
हेही वाचा: सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या
हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगालवर एक चक्राकार वारा तयार झाला आहे, जो आता हळूहळू वायव्य राज्यांच्या दिशेने येत आहे. रविवारी, करौलीच्या महावीरजीमध्ये 30 मिमी, चुरूमध्ये 32.4 मिमी, बांसवाडाच्या अर्थुवनात 35 मिमी पाऊस पडला. तसेच, छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंबिकापूरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गाड्या तीन फूट पाण्यात बुडाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग 343, अंबिकापूर-राजपूर मुख्य रस्त्यावरील पुलावरून नद्या वाहत आहेत.