SEBI Warns Nestle: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने FMCG प्रमुख नेस्ले इंडियाला इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा जारी केला आहे. कंपनीने शुक्रवारी एक्सचेंजेसना याबद्दल माहिती दिली. सेबीच्या उपमहाव्यवस्थापकांनी दिलेला इशारा कंपनीच्या अनुपालन अधिकाऱ्यांना (सीसीओ) पाठविण्यात आला. नेस्ले इंडियाने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये खुलासा केला की कंपनीला SEBI चे पत्र 6 मार्च 2025 रोजी मिळाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन हे नेस्ले कंपनीमधील नियुक्त व्यक्तीने केले आहे. तथापि, कंपनीने स्पष्ट केले की या समस्येचा त्यांच्या आर्थिक, ऑपरेशनल किंवा इतर व्यावसायिक घटकांवर कोणताही परिणाम होत नाही. सेबीच्या मते, या उल्लंघनात 'कॉन्ट्रा ट्रेडिंग' समाविष्ट होते. जेव्हा एखादा आतील व्यक्ती अल्पकालीन नफ्याच्या उद्देशाने त्याच सिक्युरिटीमध्ये मागील व्यवहाराच्या सहा महिन्यांच्या आत शेअर्स खरेदी करतो किंवा विकतो तेव्हा हे घडते.
हेही वाचा - ACB न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध माधवी पुरी बुच यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव; 4 मार्चला होणार याचिकेवर सुनावणी
इनसाइडर ट्रेडिंगबाबत सेबीचे नियम -
कंपनीच्या अंतर्गत व्यवहार बेकायदेशीर मानले जातात. याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा कंपनीत काम करणारी व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक कंपनीच्या गोपनीय माहितीचा वापर करून शेअर बाजारात व्यवहार करतात. ही माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जात नाही. हे बेकायदेशीर मानले जाते. असे करणाऱ्यांवर सेबीकडून कठोर कारवाई केली जाते. ही गोपनीय माहिती अशी माहिती आहे जी कंपनीच्या शेअरच्या किमतीवर परिणाम करू शकते.
हेही वाचा - Stock Market Fraud Case: माधवी बुच यांच्या अडचणी वाढल्या! शेअर बाजारातील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दरम्यान, स्विस बहुराष्ट्रीय कंपनी नेस्ले एस.ए. ची उपकंपनी असलेली नेस्ले इंडिया, नेस्केफे, मॅगी आणि किटकॅट सारख्या लोकप्रिय ब्रँडसाठी ओळखली जाते. कंपनी विविध प्रकारच्या अन्न आणि पेय उत्पादनांचे उत्पादन आणि विपणन करते. 31 जानेवारी रोजी एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीच्या लोकप्रिय नेस्कॅफे कॉफी ब्रँडसह पावडर आणि द्रव पेयांची विक्री वाढली. या तिमाहीत कंपनीचा एकूण कामकाजातील महसूल 4,779 कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 4,600 कोटी रुपयांपेक्षा 4 टक्क्यांनी वाढला आहे.