Sunday, August 31, 2025 04:41:14 PM

New Chairman of SEBI: होळीनंतर मिळणार सेबीला नवीन अध्यक्ष; 'या' नावांची चर्चा सुरू

सरकार 14 मार्च 2025 रोजी होळीनंतर सेबीच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. त्यामुळे सर्वांचे लक्ष सेबीच्या नव्या अध्यक्षांच्या घोषणेकडे लागले आहे.

new chairman of sebi होळीनंतर मिळणार सेबीला नवीन अध्यक्ष या नावांची चर्चा सुरू
New Chairman of SEBI
Edited Image

New Chairman of SEBI: सेबीच्या सध्याच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपत असल्याने, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहेत. माध्यमांमधील वृत्तांनुसार, सरकार 14 मार्च 2025 रोजी होळीनंतर सेबीच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. त्यामुळे सर्वांचे लक्ष सेबीच्या नव्या अध्यक्षांच्या घोषणेकडे लागले आहे.  

सेबीच्या नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण? 

सरकार सेबी अध्यक्ष कोण असावा यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सेबीच्या नवीन अध्यक्षपदासाठी सरकारने काही मोठ्या नावांचा विचार केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, वित्त सचिव तुहिन कांता पांडे, आर्थिक व्यवहार विभागाचे (डीईए) सचिव अजय सेठ, तेल सचिव पंकज जैन, आयआरडीएआयचे अध्यक्ष देबाशिष पांडा अशी काही मोठी नावे चर्चेत आहेत. या सर्वांचे सेबीचे प्रबळ दावेदार म्हणून वर्णन करण्यात येत आहे. तथापि, सरकार यापैकी एकाचे किंवा इतर दिग्गज व्यक्तीचे नाव घोषित करू शकते.

हेही वाचा - SEBI ची अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजवर मोठी कारवाई! 10 लाखांचा दंड ठोठावला

याशिवाय, अशीही चर्चा आहे की, सेबी अध्यक्ष निवडताना सरकार नोकरशहांना प्राधान्य देऊ शकते, जेणेकरून सेबीचे कामकाज सुरळीत चालू राहील आणि भविष्यातील कोणताही वाद टाळता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने जवळजवळ अंतिम निर्णय घेतला असून सरकार होळीनंतर 14 मार्च 2025 रोजी नव्या सेबी अध्यक्षांच्या नावाची घोषणा करू शकते.

हेही वाचा - 1 मार्चपासून बदलणार आर्थिक नियम! FD, LPG, UPI आणि कर नियोजनावर होणार थेट परिणाम

सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष माधवी पुरी बुच - 

माधवी पुरी बुच यांचा कार्यकाळ 2 मार्च 2022 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत होता. त्यांना सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 2017 ते 2022 पर्यंत त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य (WTM) होत्या. तथापि, त्यांच्या कार्यकाळातील हिंडेनबर्ग अहवालावरील वाद जगभरात चर्चेत विषय ठरला. अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपच्या परदेशी गुंतवणुकीवर आणि सेबीच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले होते. सेबीवर तपासात विलंब आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.


सम्बन्धित सामग्री