नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला नुकताच टेक्सास येथील ह्यूस्टनमध्ये आपल्या पत्नी आणि मुलाला भेटले. आपल्या पत्नीला आणि मुलाला पाहताच शुभांशू शुक्ला खूप भावुक झाले. अंतराळात 18 दिवस घालवल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी मंगळवारी पृथ्वीवर परतले. तसेच, आयएसएसवर पोहोचणारे ते पहिले भारतीय आहे.
शुभांशुची पत्नी म्हणाली
सध्या, शुभांशू टेक्सासमधील ह्युस्टन येथे क्वारंटाइनमध्ये आहे. त्यांची पत्नी त्यांच्या सहा वर्षांच्या मुला कियाशसह ह्युस्टनमध्ये आहे. यादरम्यान, कामना म्हणाली की, 'शुभंशु सुरक्षितपणे परतला असल्याने, आमचे संपूर्ण लक्ष त्याच्या पुनर्वसनावर आणि तो पृथ्वीच्या वातावरणाशी सहजतेने जुळवून घेऊ शकेल याची खात्री करण्यावर आहे. शुभंशुच्या अविश्वसनीय अंतराळ प्रवासानंतर त्याला पुन्हा भेटणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे', असं शुभांशुची पत्नी म्हणाली.
शुभांशुने केली भावुक पोस्ट
बुधवारी संध्याकाळी शुभांशूने आपल्या पत्नी आणि मुलासोबतच्या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. 'हे आव्हानात्मक होते. पृथ्वीवर परत येऊन माझ्या कुटुंबाला माझ्या हातात घेऊन घरासारखे वाटले. मानवी अंतराळ मोहिमा जादू करणारी असतात, पण त्या लोकांनी जादुई बनवल्या आहेत. खरंतर, अंतराळ प्रवास अद्भुत आहे. पण आपल्या प्रियजनांना खूप दिवसांनी पाहणे देखील तितकेच आश्चर्यकारक असते', असं शुभांशू शुक्ला म्हणाले.
पुढे, शुभांशुने लिहिले की, 'मी दोन महिन्यांपासून क्वारंटाइनमध्ये आहे. या काळात, जेव्हा आम्ही कुटुंबाला भेटलो तेव्हा आम्हाला आठ मीटर अंतरावर राहावे लागले. माझ्या लहान मुलाला सांगण्यात आले की त्याच्या हातावर जंतू आहेत. त्यामुळे तो त्याच्या वडिलांना स्पर्श करू शकत नाही. तो जेव्हा जेव्हा मला भेटायला यायचा तेव्हा तो त्याच्या आईला विचारायचा, 'मी माझे हात धुवू शकतो का?'. ते खूप कठीण होते.