नवी दिल्ली: सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. या दरम्यान, संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत म्हणाले की, 'जगाने आपली ताकद पाहिली'. अशातच, बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, 'सरकार म्हणते की ऑपरेशन सिंदूर चालू आहे, तर डोनाल्ड ट्रम्प ते थांबवल्याचा दावा करतात. ट्रम्प म्हणाले की त्यांनी 25 वेळा युद्धबंदी पूर्ण केल्याचे सांगितले. असे बोलणार ते कोण आहेत? हे त्यांचे काम नाही. पण, या प्रकरणावर मोदींनी मौन का राहिले? दाल में कुछ काला है'.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीबाबत सरकारवर सवाल उपस्थित केले. जेव्हा, युद्धबंदीबाबत राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, 'ट्रम्प यांनी युद्धबंदी केली असे पंतप्रधान म्हणतील? ते म्हणू शकत नाहीत, पण हेच सत्य आहे. ट्रम्प यांनी युद्धबंदी केली, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हे सत्य आहे, सत्य लपवता येत नाही'.
हेही वाचा: व्हिस्की शाकाहारी आहे की मांसाहारी? जाणून घ्या
संसदेत झालेल्या चर्चेवर राहुल गांधी म्हणाले की, 'हे फक्त युद्धबंदीबाबतच नाही, तर अनेक मोठ्या समस्या आहेत. ज्यावर मी चर्चा करू इच्छितो. संरक्षणाच्या समस्या आहेत, संरक्षण उद्योगाशी संबंधित समस्या आहेत, ऑपरेशन सिंदूरच्या समस्या आहेत, परिस्थिती चांगली नाही. संपूर्ण देशाला माहिती आहे, जे स्वतःला देशभक्त म्हणवतात, ते पळून गेले. पंतप्रधान विधान देऊ शकत नाहीत'. तसेच, राहुल गांधी म्हणाले की, 'एकीकडे, पंतप्रधान म्हणाले होते की जर ऑपरेशन सिंदूर सुरू असेल तर विजय कसा मिळवला जात आहे? तर दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर बंद केल्याचा दावा करत आहेत.यासह, त्यांनी असाही दावा केला की, 'भारताच्या परराष्ट्र धोरणाला कोणत्याही देशाने पाठिंबा दिला नाही'.
मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया
'डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाहीत, आम्हाला समजत नाही. आताही तुम्हाला डोनाल्ड ट्रम्पचे गुलाम व्हायचे आहे. देश मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळेच, आम्ही देशाच्या हितासाठी सरकारला पाठिंबा दिला. जर, ट्रम्प वारंवार आमचा अपमान करत असतील, तर आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे आणि धाडसाने बोलायला पाहिजे. कारण, कुठेतरी काहीतरी कमकुवतपणा आहे', असे वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.