Sindoor Van park to be built in Gujarat प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
Sindoor Van: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. या कारवाईदरम्यान भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. याशिवाय पाकिस्तानचे अनेक हवाई तळही उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता त्याच्या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्कचे नाव 'सिंदूर वन' असे ठेवण्यात येणार आहे. हा पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे.
हेही वाचा - भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणे उद्ध्वस्त केली होती! पाकिस्तानच्या कागदपत्रात मोठा खुलासा
आठ हेक्टरमध्ये बांधण्यात येणार 'सिंदूर पार्क' -
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भूज शहराजवळ 'सिंदूर वन' पार्क बांधला जाईल. हे उद्यान भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक म्हणून विकसित केले जाईल. याबद्दल माहिती देताना कच्छ प्रदेशाचे मुख्य वनसंरक्षक संदीप कुमार म्हणाले की, आठ हेक्टरमध्ये बांधल्या जाणाऱ्या या पार्कला 'सिंदूर वन' असे म्हटले जाईल. या पार्कमध्ये भारतीय सशस्त्र दलांना समर्पित सेना, नौदल, हवाई दल आणि सीमा सुरक्षा दल विभाग असतील. गुजरातचा कच्छ जिल्हा पाकिस्तानशी जमीन आणि सागरी सीमा सामायिक करतो. भुज शहराजवळील मिर्झापूर गाव या उद्यानासाठी निवडण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर 26 मे रोजी पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी एका जाहीर सभेला संबोधित केले होते.
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय विमाने पडली होती का? CDS अनिल चौहान यांनी केला मोठा खुलासा
'वन कवच'-
'सिंदूर वन' आठ हेक्टर क्षेत्रात पसरलेली असेल. त्यात सुमारे 80 हजार रोपे असतील, ज्यामध्ये 40 ते 45 विविध प्रजातींची झाडे, झुडुपे आणि औषधी वनस्पतींचा समावेश असेल. हे उद्यान 'वन कवच' म्हणून देखील ओळखले जाईल. उच्च घनतेचे वृक्षारोपण असलेले हे उद्यान पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील देईल.
INS विक्रांत आणि एस-400 ची झलक पाहायला मिळणार -
सिंदूर वनमध्ये आयएनएस विक्रांत, ड्रोन आणि एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली सारख्या संरक्षण उपकरणांचे भित्तिचित्र बसवले जातील. हे भित्तीचित्र ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याची कहाणी जिवंत करतील.