Monday, September 01, 2025 03:04:21 AM

हल्ला करणारे मुस्लिम नाहीत तर ...; पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट संतापला

पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चन्टने विडिओ शेयर करत संताप व्यक्त केला .मुस्लिम असल्याची लाज वाटते असं देखील तो म्हणाला .

हल्ला करणारे मुस्लिम नाहीत तर  पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट संतापला

मुंबई:काश्मीर मधील पहलगाम भ्याड दहशतवादी हल्ल्या नंतर अनेक कलाकारांनी आणि प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडिया द्वारे हळहळ व्यक्त केली. पण एका  पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ,ती पोस्ट आहे गायक सलीम मर्चन्टची .हल्ल्या नंतर त्याने इंस्टाग्रामवर एक विडिओ शेअर करत म्हटलं कि मला मुस्लिम असल्याची लाज वाटते. त्याने फक्त संताप व्यक्त नाही केला तर काश्मीरमधील लोकांच्या अडचणींवरही भाष्य केलं . 

काय म्हणाला सलीम मर्चंट ?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 27 जणांची त्यांनी गोळ्या मारून हत्या केली, तर तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. गायक सलीम मर्चंटने या हल्ल्याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.सलीमने त्याला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय, असं वक्तव्य केलं आहे. तसेच इस्लाम लोकांना मारणं शिकवत नाही. धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही, असं कुराणमध्ये लिहिलंय, असंही सलीम म्हणाला. काश्मीरमधील लोकांच्या अडचणींवरही त्यानी भाष्य केलं आहे.तो म्हणला पहलगाममध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली, ती यासाठी झाली की ते हिंदू आहेत, मुस्लीम नाहीत. त्यांना मारणारे मुस्लीम आहेत का? नाही. ते दहशतवादी आहेत. 

हेही वाचा: गौतम गंभीरला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी ; मी तुला मारेन ई-मेलमध्ये एवढे तीनच शब्द

तो पुढे म्हणाला की इस्लाम कधीच हत्या करायला शिकवत नाही. कुराणमध्ये म्हटलंय की धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही. मला मुस्लीम म्हणून लाज वाटतेय की मला हा दिवस पाहावा लागतोय. निष्पाप हिंदू लोकांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आले आहे, तेही फक्त यासाठी की ते हिंदू आहेत म्हणून , हे सगळं कधी थांबणार असा सवाल सलीमने उपस्थित केला.काश्मीरमधील लोक जे मागील 2-3  वर्षांपासून नीट जगत होते,पण आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात वादळ आहे. 

ज्या निर्दोष लोकांनी आपले जीव गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि समृद्धी देवो. ओम शांती, असं गायक सलीम मर्चंट व्हिडीओमध्ये शेवटी म्हणाला.

सलीम मर्चंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या या थेट भूमिकेचं कौतुक केलं आहे. धर्म, जात, आणि पंथाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक कलाकार माणुसकीच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा समाज नवीन विचार आणि प्रेरणा मिळते. 


सम्बन्धित सामग्री