Wednesday, August 20, 2025 08:30:30 PM

Sonia Gandhi Hospitalised: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; 'या' दिवशी मिळणार डिस्चार्ज

रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे.

sonia gandhi hospitalised सोनिया गांधी रुग्णालयात दाखल या दिवशी मिळणार डिस्चार्ज
Sonia Gandhi
Edited Image

Sonia Gandhi Hospitalised: काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना गुरुवारी संध्याकाळी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. असं सांगण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांना पोटाशी संबंधित काही समस्या होत्या, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे. सोनिया गांधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 78 वर्षांच्या झाल्या. 

रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, पोटाच्या समस्येमुळे सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती समाधानकारक असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही अजय स्वरूप यांनी सांगितलं. 

हेही वाचा - Delhi Cabinet Decisions: दिल्ली सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दिली 'कॅग अहवाल' आणि 'आयुष्मान भारत' योजनेला मंजूरी

सोनिया गांधी यांना गेल्या आठवड्यात 13 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत शेवटचे सार्वजनिकरित्या पाहिले गेले होते. 10 फेब्रुवारी रोजी सोनिया गांधी यांनी सरकारला जनगणना लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यांनी असा दावा केला की, देशातील सुमारे 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत. राज्यसभेत शून्य प्रहरात त्यांच्या पहिल्या संवादात सोनिया गांधी म्हणाल्या की, एनएफएसए अंतर्गत लाभार्थींची ओळख 2011 च्या जनगणनेनुसार केली जात आहे. 

हेही वाचा - दिल्लीत विरोधी पक्षनेता कोण असेल? अतिशी यांना मिळू शकते का संधी? वाचा सविस्तर वृत्त

दरम्यान, राज्यसभेत शून्य प्रहरात आपल्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, अन्न सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांची यादी नवीनतम लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे अद्ययावत केली पाहिजे. 2013 मध्ये यूपीए सरकारने आणलेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा देशातील 140 कोटी लोकांना अन्न आणि पोषण सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते, असंही त्यांनी नमूद केलं होतं. 

सध्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. लवकरच त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारेल आणि त्या राजकीय कार्यात सक्रिय भूमिका बजावतील. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली, त्यानंतर राजकारण सुरू झाले. दरम्यान, बुधवारी राहुल गांधी यांच्या ट्विटर पोस्टमुळे मोठा गोंधळ उडाला होता. राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. 
 


सम्बन्धित सामग्री