नवी दिल्ली: नैऋत्य मान्सून हळूहळू प्रगती करत असून अनेक राज्यांमध्ये धडकत आहे. ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. 30 मे पर्यंत ईशान्येकडील राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडेल. तर 29-30 मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस बरसेल.
मान्सून कुठे धडकणार?
नैऋत्य मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागातून पुढे सरकला आहे. पुढील 2 दिवसांत मान्सून छत्तीसगड आणि ओडिशा, ईशान्य राज्ये, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीमवर पुढे सरकेल.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस -
दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, केरळ, कर्नाटकमध्ये 28 मे ते 2 जून दरम्यान वादळ आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तामिळनाडू, पुडुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे 28-31 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. ताशी 50-60 किमी ते 70 किमी वेगाने वारे वाहतील.
हेही वाचा - पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारा 'खाकी वर्दीतला खरा हिरो'
दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात 28 मे ते 2 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाले तर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पुढील 7 दिवसांत वादळ आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 29 मे ते 1 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Monsoon 2025: विदर्भात मान्सून दाखल! अकोल्यात विक्रमी पावसाची नोंद
दिल्ली NCR मध्ये 3 दिवस पाऊस -
राजधानीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 ते 37 अंश आणि 26 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान होते. 29 ते 31 मे या पुढील तीन दिवस दिल्ली एनसीआरमध्ये आकाश ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. यासोबतच 70 किमी वेगाने वारेही वाहतील.