Sunday, August 31, 2025 09:35:40 PM

लग्न 10 दिवसांवर असताना नवरदेवाने ठोकली धूम; सासूबाईला घेऊन पळाला

प्रेमाला वयाचे बंधन नसते असे तुम्ही ऐकले असेल पण अशीच एक घटना घडली आहे. सासू जावयासोबत पळून गेल्याचे समोर आले आहे.

लग्न 10 दिवसांवर असताना नवरदेवाने ठोकली धूम सासूबाईला घेऊन पळाला

मुंबई : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे तुम्ही ऐकले असेल पण अशीच एक घटना घडली आहे. सासू जावयासोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. लग्न 10 दिवसांवर आलेलं असताना नवरदेवाने नवरी सोडून चक्क सासूला घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दोन्हीकडे असणाऱ्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

मुलीचं लग्न ऐन 10 दिवसांवर आलेलं असताना सासूने जावयासोबत धूम ठोकली आहे. 16 एप्रिल रोजी होणार होतं. लग्नाची तयार सुरू होती. अशातच हा प्रकार घडला आहे. सासू घरातील पैसे आणि दागिने घेऊन लंपास झाली आहे. दरम्यान पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेच्या नवऱ्याने पत्नी गायब असल्याची तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाने नवरीसोडून सासूबाईंसोबत पळून जात लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :दीनानाथ रुग्णालयासंदर्भात धक्कादायक माहिती समोर

अलिगढ जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. येथील एका गावातील एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न दादोन पोलीस स्टेशन परिसरातील एका तरूणाशी ठरवले होते. त्यांचा विवाह 16 एप्रिल रोजी होणार होता. नातेवाईकांमध्ये पत्रिकाही वाटण्यात आल्या. मात्र लग्न अवघ्या 10 दिवसांवर आले असताना नवरदेवाने सासूला घेत धूम ठोकली आहे. या प्रकारानंतर नवरीमुलीने टाहो फोडला आहे. स्वत:ची आईचं होणाऱ्या नवऱ्याला घेऊन पळाल्याने तिला दु:ख झाले आहे. नवरीमुलीची प्रकृती बिघडली आहे. होणाऱ्या नवऱ्याने त्यांच्या वडिलांना फोनवर सांगितले की शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही परत येणार नाही.  

मद्रक पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार माहिती देताना म्हणाले की, महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिली आहे. यानंतर महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि तिचा शोध घेतला जात आहे. तो मुलगाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे. पण दोघेही कुठे एकत्र गेले आहेत की नाही हे स्पष्ट नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण घटना स्पष्ट होईल.

 


सम्बन्धित सामग्री