दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यामुळे 14 मार्चपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होईल. दरम्यान, यंदा अध्यक्षपदासाठी दक्षिण भारतातील एखाद्या नेत्यांच्या नावावर एकमत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. देशातील १८ राज्यांत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला जाईल. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण झाल्यावर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. 14 मार्चपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तथापि, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दक्षिण भारतातील नेत्यांच्या विचार सुरू असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : लव्ह जिहाद; प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरला घरात
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2024मध्ये संपला असून त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. निवडणुकांमुळे जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली की राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. भाजपच्या संविधानानुसार, देशातील किमान अर्ध्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होऊ शकते.
नड्डा यांना संधी की नवीन नेतृत्व?
पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या मते, सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना आणखी एक कार्यकाळ देण्याऐवजी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. भाजपच्या नियमांनुसार सलग दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवड होऊ शकते, मात्र नड्डा यांनी ही जबाबदारी नव्या व्यक्तीकडे सोपवण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : नागपुरात जीबीएसचा पहिला बळी
दक्षिण भारतातून अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत
गेल्या 20 वर्षांत दक्षिण भारतातून कोणीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले नाही. 2002 ते 2004 दरम्यान व्यंकय्या नायडू (आंध्र प्रदेश) हे शेवटचे दक्षिण भारतीय अध्यक्ष होते. आरएसएस आणि त्याच्या संलग्न संघटनांसोबत यासंदर्भात चर्चा झाल्याचेही समजते.