Solar Eclipse 2027: दोन वर्षांनंतर पृथ्वीवर अशी खगोलीय घटना घडणार आहे, जी केवळ खगोलशास्त्र प्रेमींसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठी देखील एक अतिशय खास अनुभव असेल. 2027 मध्ये 2 ऑगस्ट रोजी होणारे पूर्ण सूर्यग्रहण हे 21 व्या शतकातील सर्वात लांब आणि महत्त्वाचे ग्रहण असेल. या दिवशी पृथ्वीचे काही भाग सुमारे 6 मिनिटे अंधारात असतील. याला 'ग्रेट नॉर्थ आफ्रिकन एक्लिप्सन' म्हणून ओळखले जाते. हे शतकातील सर्वात खास सूर्यग्रहण मानले जाते.
कुठे आणि कधी दिसणार सूर्यग्रहण?
ही दुर्मिळ खगोलीय घटना सोमवार, 2 ऑगस्ट 2027 रोजी होईल. या ग्रहणाचा कालावधी सुमारे 6 मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि आशियाच्या काही भागात दिसणार आहे. ते मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, इजिप्त, सौदी अरेबिया, येमेन, सुदान, सोमालिया, स्पेन आणि ओमान सारख्या 10 देशांमध्ये पूर्णपणे दिसणार आहे. कॅनडातील न्यूफाउंडलंड येथे ते अंशतः दिसू शकते.
पूर्ण सूर्यग्रहण -
जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते. या दरम्यान, पृथ्वीवरील एका अरुंद क्षेत्रात सूर्य पूर्णपणे अदृश्य होतो. याला 'संपूर्णतेचा मार्ग' म्हणतात. 2027 च्या या ग्रहणाचा मार्ग सुमारे 258 किलोमीटर रुंद असेल. हा मार्ग आफ्रिका, आशिया आणि युरोपमधून जाईल.
भारतात कधी दिसणार ग्रहण?
दरम्यान, भारतात हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण म्हणून दिसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) हे ग्रहण दुपारी 3:34 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5:53 वाजता संपेल. तथापि, भारतात पूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही.
हेही वाचा - इंडोनेशियात 280 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, पहा व्हिडिओ
2017 च्या सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये -
21 व्या शतकातील सर्वात लांब कालावधीचे सूर्यग्रहण
89 दशलक्षांहून अधिक लोक या ग्रहणाचा अनुभव घेतील.
2024 मध्ये उत्तर अमेरिकेत झालेल्या ग्रहणापेक्षा दुप्पट लोकसंख्या प्रभावित होईल.
2027 नंतर इतक्या लांब कालावधीचे ग्रहण थेट 2114 मध्ये होणार
हे सूर्यग्रहण 2024 च्या उत्तर अमेरिकेतील सूर्यग्रहणापेक्षा दुप्पट आहे.
हेही वाचा - धनबादमध्ये उंदरांवर 800 बाटल्या दारू पिल्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?
पूर्ण सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. यावेळी हे ग्रहण त्याच्या दीर्घ कालावधी आणि विस्तृत दृश्यमानतेमुळे विशेष आहे. हे सूर्यग्रहण फक्त खगोलप्रेमींनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही एक दुर्मिळ, स्मरणीय आणि नेत्रदीपक अनुभव देणारे ठरेल. तथापी, सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांचे संरक्षण खूप महत्वाचे आहे. उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहिल्याने डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.