Delhi Election Results 2025: आज भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या आपला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. अशातचं आता दिल्लीतील अनेक असे उमेदवार आहेत. ज्यांना केवळ एक अंकी मते मिळाली आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सहा उमेदवारांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'एक अंकी' मते मिळाली आहेत. हे सर्व उमेदवार छोट्या राजकीय पक्षांचे आहेत. सर्वात कमी मते भारत राष्ट्र डेमोक्रॅटिक पक्षाचे ईश्वर चंद यांना मिळाली आहेत.
ईश्वर चंद यांना केवळ चार मते मिळाली आहेत. तथापी, भीम सेनेचे संघा नंद बौद्ध, राष्ट्रवादी जनलोक पक्षाचे मुकेश जैन आणि राष्ट्रीय मानव पक्षाचे नित्या नंद सिंह यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. याव्यतिरिक्त, अपक्ष उमेदवार हैदर अली आणि पंकज शर्मा यांना प्रत्येकी नऊ मते मिळाली. हे सर्व सहा उमेदवार नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.
हेही वाचा - Delhi Election Results 2025: आपच्या पराभवाची कारणं कोणती?
भाजपने प्रचंड बहुमताने विजय -
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप 27 वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करणार आहे. भाजपने 70 पैकी 47 विधानसभा जागा जिंकल्या आहेत. शनिवारी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे प्रवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव केला. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर 4089 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
हेही वाचा - Delhi Election Results 2025: भाजपा आले, आप गेले
दरम्यान, 47 वर्षीय वर्मा यांना 30,088 मते मिळाली, तर केजरीवाल यांना 25,999 मते मिळाली आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना 4,568 मते मिळाली. दरम्यान, भाजपविरुद्ध मोठा धक्का बसलेल्या आपने 2025 च्या विधानसभा निवडणुकीत 22 जागा जिंकल्या आहेत.