Barabanki Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात शनिवारी एक भीषण रस्ता अपघात घडला. जैदपूर पोलिस स्टेशन परिसरातील हरख चौकाजवळ यूपी रोडवेजची बाराबंकीहून हैदरगडला जाणाऱ्या बसवर अचानक मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत बस चालक आणि चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. झाड कोसळताच बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून खिडकीतून उड्या मारताना दिसले. काहींनी आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी बसमध्ये परत घुसून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.
हेही वाचा - तामिळनाडूत अॅसिड फेकून ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद
झाड बसवर कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने जेसीबी मशीनच्या मदतीने झाड तोडून बसमधून अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Ahaan Panday Video: अहान पांडेने खाल्ला 'विंचू'! नेटीझन्स म्हणाले, 'यापुढे तुझा एकही चित्रपट पाहणार नाही'
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, मुख्यमंत्री योगी यांनी जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.