Wednesday, August 20, 2025 01:27:50 PM

India America Tarrif War : टॅरिफ वॉरमध्ये अमेरिकेला धक्का, चीनचा थेट भारताला पाठिंबा

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी हितरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.

india america tarrif war  टॅरिफ वॉरमध्ये अमेरिकेला धक्का चीनचा थेट भारताला पाठिंबा

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी हितरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. ऐरवी प्रत्येक गोष्टीत आपला विरोध करणाऱ्या चीनने मात्र यावेळी भारताची बाजू घेतली आहे. हा आयातशुल्काचा गैरवापर असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जैकुन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे.  

दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी फोनवरुन चर्चा केली. भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. युक्रेनसोबतच्या युद्धाच्या परिस्थितीची माहिती   पुतिन यांनी मोदींना दिली. या प्रश्नी शांततामय मार्गाने तोडगा काढावा, अशी इच्छा मोदी यांनी पुन्हा व्यक्त केली आहे. "माझे मित्र अध्यक्ष पुतिन यांच्याशी अतिशय छान आणि सखोल संवाद झाला. युक्रेनबाबतच्या ताज्या घडामोडींची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार. पुतिन यांच्या आगामी दौऱ्याविषयी आम्ही उत्सुक आहोत," असे मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

हेही वाचा: मोदींकडून लाडक्या बहिणींना बारा हजार कोटींची ओवाळणी

मोदी आणि पुतिन यांच्या संवादानंतर पुतिन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. युक्रेन युद्ध, अमेरिका आयातशुल्कवाढीचा मुद्दा आणि व्यापार आदी मुद्द्यांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. युक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिकेशी झालेल्या संवादाची माहिती पुतिन यांनी यावेळी दिली. दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या आयातशुल्काबाबत अमेरिकेतूनच विरोध सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांचे काळजीपूर्वक विकसित झालेले संबंध धोक्यात आल्याचा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीने दिला आहे. 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) पुढील महिन्यात होणाऱ्या तिआयजिन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित भेटीचे शुक्रवारी चीनकडून स्वागत करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे सुमारे सात वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिल्लीतील या विषयाशी संबंधित व्यक्तींनी या आठवड्यात दिली. 

                 

सम्बन्धित सामग्री