Uttarkashi Cloud Burst News: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाळ्यातील सर्वात मोठी आणि भयावह ढगफुटीची घटना समोर आली आहे. हर्षिल भागातील खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाल्यामुळे मोठा पूर आला, ज्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला आहे. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. तथापी, 100 हून अधिक नागरिक अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पूरात वाहून गेले 5 हॉटेल्स -
गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धाराली गावात खीर गंगा नदीने रौद्ररूप धारण केले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा आल्याने येथील पाट हॉटेल्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तथापी, 10 ते 12 कामगार गाडले गेल्याची शक्यता आहे. डोंगरकड्यांवरून आलेल्या माती, दगड व झाडांनी अनेक घरांचे नुकसान झाले. ढगफुटीमुळे नद्यांना पूर आला असून, संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - Cloudburst in Uttarkashi: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! अनेक इमारती वाहून गेल्या, पहा थरारक दृश्य
बचाव कार्य सुरू -
आपत्तीची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्करी आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितले की, ढगफुटी प्रभावित परिसरात अनेक पर्यटक देखील अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
हेल्पलाइन क्रमांक जारी -
आपत्तीमुळे नागरिकांना मदत मिळावी म्हणून उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. नागरिक 01374-222126, 01374-222722 आणि 9456556431 या क्रमाकांवर कॉल करून आवश्यक माहिती मिळवू शकतात.