Thursday, August 21, 2025 01:49:47 AM

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर; मतदान आणि निकाल कधी लागणार? जाणून घ्या

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होत आहेत.

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर मतदान आणि निकाल कधी लागणार जाणून घ्या
Vice Presidential Election Date Announced
Edited Image

नवी दिल्ली: भारताचे पुढचे उपराष्ट्रपती कोण असतील याचा निर्णय आता 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आणि प्रक्रिया जाहीर केल्या आहेत. गरज पडल्यास उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान 9 सप्टेंबर रोजी होईल आणि निकालही त्याच दिवशी जाहीर केले जातील. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होत आहेत.

उपराष्ट्रपती निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम:

अधिसूचना प्रसिद्धी – 7 ऑगस्ट 2025(गुरुवार)

नामांकनाची अंतिम तारीख – 21 ऑगस्ट 2025 (गुरुवार)

नामांकन छाननी – 22 ऑगस्ट 2025  (शुक्रवार)

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)

मतदान (आवश्यक असल्यास) – 9 सप्टेंबर 2025 (मंगळवार), सकाळी 10 ते सायंकाळी 5

मतमोजणी (त्याच दिवशी) – 9 सप्टेंबर 2025 (मंगळवार)

कोण करणार मतदान?

भारतीय संविधानाच्या कलम 66 नुसार, उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते, ज्यामध्ये एकल हस्तांतरणीय मत पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. ही निवड एकल हस्तांतरणीय मत पद्धतीने आणि गुप्त मतदानाद्वारे केली जाते.

हेही वाचा - बलात्कार प्रकरणात JDS नेते प्रज्वल रेवण्णा दोषी; 2 ऑगस्ट जाहीर होणार शिक्षा

एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली म्हणजे काय?

या प्रणालीत प्रत्येक मतदाराला उमेदवारांच्या नावांपुढे पसंती क्रमाने अंक लिहावे लागतात. पसंती भारतीय अंकांद्वारे दर्शविली जाते. पसंती आंतरराष्ट्रीय स्वरूपात, रोमन स्वरूपात किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय भाषेत चिन्हांकित केली जाऊ शकते. मतदार उमेदवारांच्या संख्येइतके पसंती चिन्हांकित करू शकतो. मतपत्रिका वैध होण्यासाठी पहिला पसंती चिन्हांकित करणे अनिवार्य असले तरी, इतर पसंती चिन्हांकित करणे पर्यायी आहे. तथापी, आयोगाद्वारे दिलेल्या विशेष पेननेच सदस्यांना चिन्हांकित करावे लागेल. इतर पेनने चिन्हांकित मतपत्रिका अवैध ठरवल्या जातात. 

हेही वाचा - यंदा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी तुमचं मत मांडणार! भाषणासाठी मागवल्या सूचना

देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे संवैधानिक पद रिक्त असल्याने, 9 सप्टेंबरचा दिवस निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकतेच्या दृष्टीने सविस्तर वेळापत्रक जाहीर करून प्रक्रिया सुरू केली आहे. आता सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या घोषणेकडे आणि संभाव्य राजकीय समीकरणांकडे लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री