Wednesday, August 20, 2025 09:18:25 AM

फास्टटॅग वार्षिक पासचं बुकिंग कुठे आणि कसं कराल? जाणून घ्या

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे.

फास्टटॅग वार्षिक पासचं बुकिंग कुठे आणि कसं कराल जाणून घ्या

मुंबई: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे. या टोल पासची किंमत 3 हजार रुपये इतकी असून यासाठी वापरकर्त्यांना ते प्री-बुक करावे लागेल. 1 जुलैपासून बुकिंग प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबतची अंतिम अंमलबजावणी पुढील आठवड्यात केली जाईल. 

मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (IHMCL) या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) सल्ला दिला आहे. या नवीन योजनेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशभरातील 119 टोल नाक्यांवर यासाठीची सर्व तयारी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: 'हिंदी भाषेसंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द'; फडणवीसांचा मोठा निर्णय


वार्षिक टोल पासची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

वार्षिक टोल पासची किंमत: 3 हजार रुपये 

वैधता: 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 200 ट्रिप्स, जे आधी पूर्ण होईल

सुरुवात: 15 ऑगस्ट 2025


वार्षिक टोल पाससाठी कोण अर्ज करू शकतात?

हा वार्षिक पास फक्त कार, जीप आणि व्हॅन सारख्या गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी आहे. सर्व फास्टॅग वापरकर्ते वार्षिक टोलपास खरेदी करू शकणार नाहीत. यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. यासह, वाहनाच्या पुढच्या काचेवर सक्रिय फास्टॅग बसवलेला असावा. त्यासोबतच, फास्टॅग वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी योग्य प्रकारे जोडलेला असावा. ज्या फास्टॅग युजर्सचा फास्टॅग अजूनही तात्पुरत्या क्रमांकाशी लिंक आहे, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी तो अपडेट करणे गरजेचे आहे. 


वार्षिक टोल पाससाठी महत्त्वाची सूचना:

15 ऑगस्टपासून हा वार्षिक टोल पास फक्त अधिकृत सरकारी अ‍ॅप किंवा वेबसाइटवरूनच खरेदी करता येणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांपासून सावध राहा. तसेच अधिकृत संकेतस्थाळावरून माहिती घेत राहा.


सम्बन्धित सामग्री