Operation Sindoor Logo: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'चे नाव प्रत्येकाच्या मनात कोरले गेले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. भारतीय सैन्याने आपले शौर्य आणि धाडस दाखवत 6 मे रोजी रात्री उशिरा पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो जारी. तसेच या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे सांगितले. तेव्हापासून ऑपरेशन सिंदूरचा हा लोगो खूप लोकप्रिय झाला.
हेही वाचा - हेरगिरीचे आरोप सिद्ध झाल्यास काय शिक्षा होऊ शकते? काय आहेत नियम? जाणून घ्या
ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी डिझाइन केला?
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना ऑपरेशन सिंदूरचे नाव प्रत्येक भारतीयांच्या कानावर पडले. परंतु, ऑपरेशन सिंदूरचा हा लोगो कोणी तयार केला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अखेर आता याबद्दलची माहितीही समोर आली आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' चा साधा आणि प्रतीकात्मक लोगो दोन लष्करी कर्मचाऱ्यांनी डिझाइन केला होता. या लोगोने देशातील कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधून घेतले. या निर्णायक लष्करी कारवाईचा लोगो लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग यांनी डिझाइन केला होता.
हेही वाचा - ''ऑपरेशन सिंदूरचं राजकारण थांबवा''; संजय राऊत यांची कठोर शब्दांत टीका
ऑपरेशन सिंदूरला समर्पित भारतीय लष्कराच्या मासिक 'बातचीत'मध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. लष्कराने या मासिकाच्या विशेष अंकात दोन्ही सैनिकांचे फोटो लोकांसोबत शेअर केले आहेत. या सतरा पानांच्या मासिकाच्या पहिल्या भागात वरच्या बाजूला भारतीय सैन्याचे चिन्ह छापलेले आहे आणि संपूर्ण पानावर 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो आहे.