Woman Dies Due to sulphas tablet प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
झाबुआ: मध्य प्रदेशातील झाबुआ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने एका मेडिकल स्टोअरवाल्याला दातदुखीची गोळी मागितली, पण दुकानदाराने तिला सल्फासची गोळी दिली. या महिलेने दातदुखीवर औषध समजून ती खाल्ली. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून मेडिकल स्टोअरमध्ये औषध विकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, झाबुआचे पोलिस अधीक्षक पदम विलोचन शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी दुकान मालकाला भारतीय दंड संहितेच्या (बीएनसी) कलम 105 (हत्या न करता सदोष मनुष्यवध) अंतर्गत अटक केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरमपुरी गावातील रहिवासी रेखा गुरुवारी संध्याकाळी थंडला गेटजवळील एका मेडिकल स्टोअरमध्ये गेली. तिने दातदुखी कमी करण्यासाठी औषध मागितले होते. दुकानातील विक्रेत्याने त्यांना सल्फाच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु, तिथे तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - Viral Video: दहावीत फक्त 35 टक्के मिळवून पठ्ठ्याची गल्लीत हवा! खांद्यावर घेऊन काढण्यात आली मिरवणूक
या सर्व प्रकाराची माहिती पीडित महिलेच्या कुटुंबाने शुक्रवारी पोलिसांना दिली. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सल्फामुळे मृत्यू झाल्याचे निश्चित झाले, त्यानंतर मेडिकल स्टोअर मधील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुकान मालक लोकेंद्र बाबेल (52) याला अटक करण्यात आली.
हेही वाचा - बुडत्या नावेत सेल्फी घेत होत्या तरुणी, नेटिझन्स म्हणाले, 'विमा कंपनी क्लेमही नाही स्वीकारणार!'
पोलिसांनी दुकानात सल्फाच्या गोळ्या का ठेवल्या होत्या? याचा तपास सुरू आहे. दुकान सील करण्यात आले असून या घटनेचा ड्रग कंट्रोलर विभाग देखील तपास करत आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरातील एकचं खळबळ उडाली आहे.