Wednesday, August 20, 2025 02:05:03 PM

132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण; सरकारचा निर्णय

महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे.

132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण सरकारचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली. याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर 15 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा : वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयाबाहेर राडा


 


सम्बन्धित सामग्री