Man Dies Due to Drinking Coconut Water: खर तर जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते तेव्हा तिला नारळ पाणी दिलं जातं. पण हेचं नारळ पाणी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. होय, नारळ पाणी प्यायल्यामुळे डेन्मार्कच्या आरहस शहरात राहणाऱ्या एका 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर, या नारळ पाण्यामुळे मेंदूला गंभीर नुकसान झाल्याचे तपासात समोर आले. द मिररच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने एक नारळ विकत घेतला होता. जो त्याने फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी स्वयंपाकघरातील काउंटरवर ठेवला. एका महिन्यानंतर त्याने ते नारळ पाणी पिण्याचा प्रयत्न केला. त्याने नारळातून एक छोटासा घोट घेताच, त्याला त्याची चव घाणेरडी वाटली. त्याने नारळ उघडले. यावेळी त्याला नारळ आतून चिकट आणि कुजलेले आढळले. त्याने हा नारळ कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला.
हेही वाचा - बापानेच रचला विकृत कृत्याचा संसार! स्वतःच्या मुलीशीच लग्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी संतप्त
तीन तासांनंतर बिघडली तब्येत -
नारळ पाणी पिल्यानंतर सुमारे 3 तासांनी त्या व्यक्तीला खूप ताप, घाम येणे आणि उलट्या होऊ लागल्या. रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि वैद्यकीय पथक पोहोचेपर्यंत त्याची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एमआरआय चाचणीत मेंदूला सूज आल्याचे दिसून आले. मेटाबॉलिक एन्सेफॅलोपॅथी नावाच्या आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले, परंतु अवघ्या 26 तासांनंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.
हेही वाचा - धार्मिक कार्यक्रमादरम्यान 100 फूट उंच रथ कोसळला; दोघांचा मृत्यू, कुठे घडली घटना? जाणून घ्या
शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीच्या श्वासनलिकेमध्ये बुरशी आढळून आली आणि नारळाच्या तपासणीत आर्थ्रिनियम सॅकॅरिकोला नावाची बुरशी आढळून आली. या बुरशीमुळे 3-नायट्रोप्रोपियोनिक अॅसिड (3-एनपीए) नावाचा विषारी पदार्थ तयार होतो, जो मेंदूवर गंभीर परिणाम करतो. या विषामुळे या व्यक्तीला गंभीर न्यूरोलॉजिकल नुकसान झाले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याआधी चीन आणि आफ्रिकेत या विषामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.