Sunday, August 31, 2025 02:47:08 PM

विधानसभेत 78 नवीन चेहरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीत 78 आमदार पहिल्यांदाच विधानसभा सदस्य बनले आहेत.

विधानसभेत 78 नवीन चेहरे

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत 78 आमदार पहिल्यांदाच विधानसभा सदस्य बनले आहेत. नवे चेहरे देण्यात भाजपाने बाजी मारली आहे. त्याचे 132 आमदार निवडून आले असून त्यापैकी 33 आमदार हे पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य झाले आहेत. नव्या चेहऱ्यांमध्ये तरूणांचा समावेश समाधानकारक आहे. मुंबईत 9 आमदार विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आले आहेत. 

 

पक्षनिहाय नव्या आमदारांची संख्या

भाजपा पक्षाचे 33 नवे चेहरे बनले आहेत. शिवसेना पक्षाचे 14 नवीन आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे गटाचे 10 नवे चेहरे विधानसभेत गेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे 8 नवीन चेहरे विधानसभेत निवडून आले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 6 नवे चेहरे विधानसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार गटाचे 4 नवीन चेहरे पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले आहेत. अन्य लहान पक्षाचे 2 नवे चेहरे विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर अपक्ष 1 नवीन चेहरा विधानसभेत पहिल्यांदा निवडून आला आहे.  


सम्बन्धित सामग्री