Heart Attack प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
सीकर: राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 9 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणारी ही चौथीतील मुलगी बुधवारी सकाळी 11 वाजता जेवणाच्या सुट्टीत अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मुख्याध्यापक नंदकिशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिफिन उघडताना मुलगी अचानक खाली कोसळली. तिला तात्काळ दांता रामगड सीएचसी येथे नेण्यात आले आणि नंतर सीकरच्या एसके रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेतच तिला दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
मुलांमध्ये वाढत आहे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण -
या घटनेमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, मुलांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ही घटना दुर्मीळ असली तरी जन्मजात दोष, मायोकार्डिटिस, कावासाकी रोग, कोलेस्टेरॉल विकार आणि कोविडनंतरच्या गुंतागुंतीमुळे अशा घटना होऊ शकतात.
हेही वाचा - फेसबुक जाहिरात ठरली जीवघेणी! वजन कमी करण्याच्या सर्जरीनंतर महिलेचा मृत्यू
हृदयविकाराची लक्षणे ओळखा -
दरम्यान, मुलांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास, चक्कर, थकवा, उलटीसारखे वाटणे यासारखी लक्षणे आढळल्यास ती दुर्लक्षित न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
हेही वाचा - हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय -
हृदयविकारावर औषधे, शस्त्रक्रिया किंवा विशेष प्रकारची कॅथेटर यांचा समावेश असू शकतो. डॉक्टर रोगाचे कारण आणि स्थितीनुसार उपचार ठरवू शकतात. त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. मुलांना नियमित आरोग्य तपासणीसाठी घेऊन जाणे तसेच त्यांना संतुलित आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.