Wednesday, August 20, 2025 09:19:01 AM

स्वप्नीलच्या घरी आली नवी कार ! रेंज रोव्हर डिफेंडर आणि स्वप्नीलची स्वप्नपूर्ती

2024 वर्ष स्वप्नील जोशीसाठी (Swapnil Joshi) अनेक गोष्टींसाठी खास ठरलं मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट !

स्वप्नीलच्या घरी आली नवी कार 
रेंज रोव्हर डिफेंडर आणि स्वप्नीलची स्वप्नपूर्ती

मुंबई - 2024 वर्ष स्वप्नील जोशीसाठी (Swapnil Joshi) अनेक गोष्टींसाठी खास ठरलं मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट ! अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका चोखपणे साकारून स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसतोय.

वर्ष संपताना स्वप्नीलची अजून एक स्वप्नपूर्ती झाली असून त्याने त्याचा नवीन गाडीच स्वागत केलं आहे. स्वप्नीलने नवी कोरी रेंज रोव्हर डिफेंडर (Defender) घेतली असून पुन्हा हे वर्ष खास केलं आहे. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट करून नव्या गाडीबद्दल खास गोष्ट लिहिली आहे. डिअर जिंदगी अस म्हणत आयुष्याला समर्पित एक छान पत्र लिहून त्याने त्याचा भावना व्यक्त केल्या आहेत. 

स्वप्नील म्हणतो " डिअर जिंदगी- आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे.  डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं. ही फक्त सुरुवात आहे माहित आहे की या प्रवासात उतार-चढाव आले आहेत पण जिद्दीने पार करून अजून गोष्टी करण्याची ऊर्मी यातून मिळतेय" 

ब्लॉकबस्टर चित्रपट, सातत्यपूर्ण काम आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार निर्माता - अभिनेता स्वप्नील येणाऱ्या वर्षात देखील खूप चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. जिलबी, सुशीला- सुजीत सोबत अनेक चित्रपटात स्वप्नील दिसणार असून प्रेक्षक त्यांच्या प्रोजेक्ट्स साठी उत्सुक आहेत.


सम्बन्धित सामग्री