Thursday, August 21, 2025 05:38:58 AM

पुण्यानंतर आता वांद्रे येथील पोर्शे कारचा अपघात चर्चेत

मुंबईतील वांद्रे येथे पोर्शे कारचा अपघात झाला आहे. धक्कादायक म्हणजे एक 19 वर्षीय मुलगा ही पोर्शे कार चालवत असून तो मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्याचं देखील समोर आला आहे.

पुण्यानंतर आता वांद्रे येथील पोर्शे कारचा अपघात चर्चेत

मुंबई : काही महिन्यांपूर्वी पुण्यातील पोर्शे कारचा अपघात चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर आता पुन्हा मुंबईतील वांद्रे येथे पोर्शे कारचा अपघात झाला आहे. धक्कादायक म्हणजे एक 19 वर्षीय मुलगा ही पोर्शे कार चालवत असून तो मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्याचं देखील समोर आला आहे. ही  संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

शनिवारी पहाटे एका भरधाव पोर्शे गाडीने फूटपाथजवळ उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. यावेळी ही पोर्शे कार 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. वांद्रे परिसरातील साधू वासवानी चौकात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. 

अचानक ही कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली. ही धडक इतकी भिसहन होती की काही दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने ही कार झाडावर आदळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने या अपघातात कुठली जीवितहानी झालेली नाही. 
या गाडीत चार जण असल्याची माहिती समोर आली असून  ही गाडी 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रीणही याच गाडीतून प्रवास करत होते. दरम्यान आता मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या मुलावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री